हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पाच शाळा होणार हायटेक

राजेश दारव्हेकर
Friday, 30 October 2020

राज्यातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या जवळपास ३०० आदर्श शाळा विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .

हिंगोली : मार्चमध्ये पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात राज्यातील तीनशे जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यात हिंगोली जिल्ह्यातील पाच शाळा हायटेक होणार आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या जवळपास ३०० आदर्श शाळा विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात शासनाने प्रत्येक जिल्हा स्तरावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील आदर्श शाळांची नावे मागविण्यात आली होती. ज्या शाळांमध्ये भौतिक सुविधा, शाळेत शैक्षणिक गुणवत्ता आणि मुलांना प्रशासकीय बाबी कार्यक्षम आहेत. ज्ञान अशांची निवड यामध्ये करण्यात याकरीता आली आहे.

हेही वाचा -  ‘स्वारातीम’ विद्यापीठ परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

या तालुक्यातील शाळांचा समावेश

हिंगोली जिल्ह्यातील पाच शाळांचा समावेश करण्यात  आला आहे. ज्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळदरी, वसमत तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील शाळा,  कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील केंद्रीय प्राथमिक शाळा, सेनगाव तालुक्यातील हाताळा येथील शाळाचा समावेश आहे.

शाळेत पाल्यांना गुणवत्तापूर्ण शाळा शिक्षणासाठी पालक निर्णय पाठविण्यास तयार होतील

या शाळेत प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम राबविला जाणार आहे.   दरम्यान, आदर्श शाळेकडे पाल्यासह शिक्षण विद्यार्थी आकर्षित होऊन इतर शाळा सोडून या शाळेत पाल्यांना गुणवत्तापूर्ण शाळा शिक्षणासाठी पालक निर्णय पाठविण्यास तयार होतील, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध शालेय वसहशालेय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी तयार असणे हे ती शाळा आदर्श शाळा असल्याचे दर्शविते . आदर्श शाळेमध्ये वातावरण प्रसन्न असावे , विद्यार्थ्यांना शाळेत यावसे वाटणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना शनिवारी व रविवारी देखील शाळेत यावेसे वाटले पाहिजे , मुलांना विविध विषयातील ज्ञान अवगत करता यावे याकरीता त्यांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी दप्तराच्या ओझ्या पासून मुक्तता मिळावी या उद्देशाने प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Zilla Parishad schools in Hingoli district will be high-tech hingoli news