
NDRF Rescue
sakal
निलंगा : शेताकडे गाय घेऊन जाताना काटेजवळगा ता. निलंगा येथील ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात दोघे वाहून गेल्याची घटना रविवारी ता. २१ रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली यामध्ये एकजण बचावला तर एक बेपत्ता आहे. बेपत्ता शेतकऱ्यांना शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. निलंगा तालुक्यात पावसाने झोडपले असून पावसाचा कहर झाला आहे.