mud in home
sakal
गेवराई - गोदावरी नदीला जायकवाडीतून तब्बल तीन लाखांहून आधिक क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आले होते. त्यामुळे गेवराई तालुक्यातील ३२ गावांना या पुराचा तडाखा बसला. यात प्रामुख्याने नदीकाठावरील राजापूर, काठोडा, गुळज आणि राक्षसभुवन ही गावे पुर्णतःपाण्यात गेली होती.सोमवारी पाणी कमी होताच बुधवारी स्थलांतरित झालेले गावकरी घराकडे परत गेले.