कर्नाटकातील दारूचा महाराष्ट्रात वाहतोय महापूर

विनोद आपटे
शनिवार, 25 एप्रिल 2020


मुक्रमाबाद शहर हे, कर्नाटक व तेंलगणाच्या सिमेवर आहे. तर कर्नाटक राज्याची सिमा ही, फक्त पाच कि.मी. तर तेलंगणा राज्याची सिमा ही २० कि.मी. अंतरावर आहे. राज्यात सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान माजविले असल्यामुळे राज्यातील सर्वच शासनमान्य दारूची दुकाने बंद केली असताना मात्र शेजारी असलेल्या या दोन राज्यातून रोज हजारो लिटर दारू ही प्रशासनाच्या नाकाखालून महाराष्ट्राच्या हद्दीत आणून बिनदिख्खत पणे चढ्या भावाने विक्री करत असल्यामुळे लॉकडाऊन असतानाही दारू म्हणेल तेवढी व हवा तो ब्रॕन्ड सहज उपलब्ध होत असल्यामुळे मद्यापींचे चांगभले झाले आहे. 

मुक्रमाबाद, (ता. मुखेड, जि. नांदेड) ः दिवसेंदिवस कोरोनाचा धोका अधिक बळावत चालल्यामुळे शहरासह ग्रामीण भागही या कोरोनाच्या साववटाखाली सापडत असल्यामुळे कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करून शासन मान्य परमिट बार व देशी दारूच्या दुकानाला सील ठोकून अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. तरी शेजारी असलेल्या कर्नाटक व तेंलगणा राज्यातून महाराष्ट्रात म्हणेल तेवढी दारू महाराष्ट्रात येत असल्यामुळे लॉकडाऊन असूनही मागेल तेव्हढी दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे लॉकडाऊन आहे का? नाही असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

 

हेही वाचा -  देगलूरच्या त्या १९ गावांचा खंडीत वीजपुरवठा सुरु
 

मुक्रमाबाद शहर हे, कर्नाटक व तेंलगणाच्या सिमेवर आहे. तर कर्नाटक राज्याची सिमा ही, फक्त पाच कि.मी. तर तेलंगणा राज्याची सिमा ही २० कि.मी. अंतरावर आहे. राज्यात सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान माजविले असल्यामुळे राज्यातील सर्वच शासनमान्य दारूची दुकाने बंद केली असताना मात्र शेजारी असलेल्या या दोन राज्यातून रोज हजारो लिटर दारू ही प्रशासनाच्या नाकाखालून महाराष्ट्राच्या हद्दीत आणून बिनदिख्खत पणे चढ्या भावाने विक्री करत असल्यामुळे लॉकडाऊन असतानाही दारू म्हणेल तेवढी व हवा तो ब्रॕन्ड सहज उपलब्ध होत असल्यामुळे मद्यापींचे चांगभले झाले आहे. तर शंभरची क्वार्टर ही तब्बल चारशे रूपयाला विक्री होत असल्यामुळे दारू विक्रेते माला-माल झाली आहेत.

 

एका कॉलवर ग्राहकांना दारू घरपोच
झटपट पैसे कमावण्याच्या नादात सध्या शहरात अवैध दारू विक्रीचा धंदा चांगलाच तेजीत असून अनेकजण कर्नाटक व तेलंगणा राज्यातून गिऱ्हाईकांना हवे असलेल्या ब्रॕन्डची दारू आणून शहरातील सर्वच मद्यापींना एका कॉलवर हवी असलेली मुबलक प्रमाणात दारू घरपोच सेवा देत असल्यामुळे गिऱ्हाईकही दारू मिळत असल्यामुळे खूष आहेत. तर दारू विक्रते हे, शंभर रूपयेची क्वार्टर ही चारशे रूपयेला विकत असल्यामुळे माला माला होत आहेत.

 

सिमा बंदी असताना महाराष्ट्रात दारू येतेच कशी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कर्नाटक व तेलंगणा राज्यातून आपल्या राज्यात कोणताही व्यक्ती येऊ नये म्हणून राज्याच्या सिमेवर ‘सीसीटिव्ही’ बसऊन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला असतानाही या राज्यातून देशी व विदेशी दारू रोज हजारो लिटर येतच कशी? या दारूमुळे अनेकांचे संस्कार उद्वस्त झाले असून निदान या कोरोनामुळे तरी शहरातील दारू बंद राहील असे वाटत होते. पण पुर्वीपेक्षाही अधिक दारूची घरपोच विक्री होत असून यासाठी पोलिस प्रशासनच जबाबदार असून याची परवानगी शिवाय कर्नाटक व तेलंगणा राज्यातून दारू येणे शक्य नाही. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A flood of alcohol is flowing in Maharashtra from Karnataka, nanded news