
Jalna Farmers Protest
sakal
विष्णू नाझरकर
जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मंठा तालुक्यातील जयपूर, ढोकसाळ,वडगाव, तळणी, गोसावी पांगरी या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने अद्यापही पंचनामे न केल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.