Latur Floods: अतिवृष्टीचा पाच लाख शेतकऱ्यांना फटका; अतिपावसामुळे तीन लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
Crop Loss: लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ३ लाख ६८ हजार हेक्टरवर खरिप पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
लातूर : काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. हाताशी आलेले पीक वाहून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ता. २२ सप्टेंबरपर्यंत पाच लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.