esakal | हिंगोलीत लॉकडाउनमुळे फुलशेती कोमेजली 
sakal

बोलून बातमी शोधा

Waranga Fata Fulseti

या वर्षीही फुलशेतीतून चांगले उत्पादन हाती आले आहे. मात्र, लॉकडाउनमुळे फुलउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. फुलांचे उत्पादन चांगले निघाले असतानाही विक्रीअभावी फुले शेतातच कोमेजून जात असल्याचे चित्र आहे. 

हिंगोलीत लॉकडाउनमुळे फुलशेती कोमेजली 

sakal_logo
By
मुजाहेद सिद्दिकी/शंकर रहाटीकर

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : लॉकडाउनचा फटका चुंचा, तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील फुलउत्पादकांना बसला असून विक्रीअभावी फुलशेती कोमेजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. फुलविक्रीतून अनेकांना रोजगार मिळाला होता. मात्र, फुलविक्रीच होत नसल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरातील अनेक शेतकरी फुलशेती करतात. गुलाब, गलांडा, शेवंती, झेंडू आदी फुलांचा त्‍यात समावेश आहे. फुलउत्पादक शेतकरी दररोज सकाळ, सायंकाळी फुलांची तोडणी करून हार तयार करतात. 

हेही वाचा - Video ः रोगप्रतिकारशक्‍तीच्या वाढीसाठी या पंचसूत्रीचा अवलंब करा

हजारो रुपयांची उलाढाल

त्यानंतर हारांची वारंगाफाटा येथील मार्केटमध्ये विक्री केली जाते. यातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होते. यातून हाती आलेल्या पैशातून घरसंसारासाठी मदत होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून वारंगा फाटा परिसरातील फुलशेती बहरली आहे. 

फुले जाताहेत कोमेजून 

या वर्षीही फुलशेतीतून चांगले उत्पादन हाती आले आहे. मात्र, लॉकडाउनमुळे फुलउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. फुलांचे उत्पादन चांगले निघाले असतानाही विक्रीअभावी फुले शेतातच कोमेजून जात असल्याचे चित्र आहे. चुंचा येथील प्रदीप नरवाडे व तोंडापूर येथील फुलउत्पादक शेतकरी बालाजी थोरात हे काही वर्षांपासून फुलशेती करतात. 

आशेवर पाणी फेरले

त्‍यांना फुले व हारांच्या विक्रीतून हमखास नफा मिळतो. मात्र, लॉकडाउनमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आता तर लग्नसराई, विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. यातून हजारो रुपयांचे उत्पन्न हाती येणार होते. मात्र, यावर आता पाणी फेरले आहे. तसेच कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वच व्यवहार बंद 

दोन एकरांत फुलांची लागवड केली आहे. हार व फुलांच्या नियमित विक्रीतून तीन ते चार हजार रुपये मिळत होते. लग्नसराई, इतर समारंभासाठी हारांना चांगली मागणी आहे. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार बंद झाल्याने अडचणी येत आहेत.
-प्रदीप नरवाडे, फुलउत्‍पादक, चुंचा

येथे क्लिक कराहिंगोलीत राजस्‍थानकडे जाणारे २६३ कामगार सीमाबंदीमुळे अडकले

हयातनगर येथील शेतकरी अडचणीत

हयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर येथील फुलउत्‍पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. लॉकडाउनमुळे फुलविक्री बंद झाल्याने फुले तोडणीअभावी सुकून जात आहेत.
हयातनगर येथील शेतकरी तुळशिराम सोळंके यांना सहा ते सात एकर शेती आहे. त्‍यांनी गुलाब, निशिगंधा, झेंडू, शिर्डी गुलाब यासह विविध जातींची फुले लावली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन 

 काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील रस्‍ते बंद झाले आहेत. फुले विकण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. फुलविक्री बंद झाल्याने फुलांची झाडे जागेवरच वाळून जात आहेत.

loading image