Video ः रोगप्रतिकारशक्‍तीच्या वाढीसाठी या पंचसूत्रीचा अवलंब करा 

yoga
yoga

हिंगोली ः ‘कोरोना’पासून दूर राहण्यासाठी योग, प्राणायाम करून पंचसूत्रीचा वापर केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्‍ती वाढीस निश्चितच मदत होते. प्रत्‍येकाने या सूत्रांचा वापर करून नियमित योग व प्राणायाम करावे, असा सल्‍ला योग शिक्षिका प्रीती सोवितकर यांनी दिला आहे.

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्‍येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे आता काळाची गरज झाली आहे. वैयक्‍तिक स्‍वच्‍छतेसह परिसर स्‍वच्‍छतादेखील केली पाहिजे तसेच शरीरातील प्रतिकारशक्‍ती कमी होणार यासाठीदेखील नियमित योग व प्राणायम केल्यास हा आजार जवळ येणारच नाही. 

शरीर मजबूत होण्यास मदत
योग व प्राणायम करताना पंचसूत्रीचा वापर करावा. यात भसरिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भाम्ररी, उज्‍जेय या पंचसूत्रीचा वापर करावा. यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते. भसरीकामध्ये श्वास घेऊन परत श्वास करावा लागतो. यामुळे हृदयाचे कोणतेही आजार होणार नाहीत. कपालभातीमध्ये नाकाने श्वास सोडावा व पोटाचा भाग वर उचलावा. यामुळे पोटासह श्वसनास मदत होते. अनुलोम विलोममध्ये डाव्या नाकाने श्वास करायचा. उजव्या नाकाने सोडावा परत त्याच नाकपुडीने श्वास घ्यावा, दुसऱ्या नाकपुडीने सोडावा असे केल्यानेदेखील हृदयाचे आजार होणार नाहीत. भाम्ररीमध्ये तोंड बंद करून नाकाने ओमचा उच्चार करावा तर उज्‍जैयमध्येदेखील ओमचा उच्चार करावा. यामुळे शरीरातील रोगशक्‍ती वाढण्यास मोठी मदत होते. योग व प्राणायाम कधीही घरच्या घरी करता येतात. मात्र, त्‍यासाठी सकाळची वेळ अधिक चांगली असते. स्‍वच्‍छ हवेत हे प्राणाम करावेत.

ही आसने करावीत
आसनांमध्ये वक्रासन, सूर्यनस्‍कार, वृक्षासन, धुनरासन, मंडुकासहन, नटरासन, शषकासन यामुळे शरीराचा समातोल राखण्यास मदत होते. तसेच पाठीवरील व पोटावरीलदेखील अनेक आसने आहेत, तीदेखील केल्यास शरीरास थकवा येणार नाही. पचनशक्‍ती वाढण्यास मदत होते. तसेच योगीक जॉगिंगमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. परंतु, ही आसने नियिमित न थकता केली पाहिजे.

गुळवेलचा काढा घरातील सर्वांना द्यावा
या सर्व क्रियेमुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. यासह आहारावरदेखील नियत्रंण असावे. शुद्ध शाकाहारी अन्न खावे. हिरव्या पालेभाज्याचे, फळभाज्या, डाळी याचा वापर केला पाहिजे. उन्हाळ्यात आता सातूच्या पिठाचादेखील वापर करावा, आर्युवेदिक वनस्‍पतीत असलेल्या गुळवेल या वनस्‍पतीचा काढा घरातील सर्वांना द्यावा. योग व प्राणायम हे तीन वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्‍तीला करता येतो. यामुळे नियमित योग व प्राणायम करा व कोणत्याही आजारापासून दूर राहा, असा सल्‍ला योग शिक्षिका प्रीती सोवितकर यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com