esakal | कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा ५ हजारांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा ५ हजारांचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्याकरीता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोमवारपासून सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. त्यात सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक व त्यांच्या आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांनीही लसीकरण केलेले असावे, असे निर्देश दिले असून नियमांचे पालन न करणाऱ्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांचे लसीकरण बंधनकारक आहे. ग्राहकांचे तापमान घेण्याकरीता थर्मामीटर तसेच मास्कचा वापर, सॅनिटायझर, सामाजिक अंतर करावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरणाचे डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. आस्थापना प्रमुखांची ती जबाबदारी आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स, कर्मचारी यांचे लसीकरण अनिवार्य आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणीही निगेटिव्ह अपेक्षित आहे.

हेही वाचा: नाशिककरांंनो, लग्न समारंभात कोरोनाचे हे नियम पाळा

आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खुल्या प्रांगणातील लॉन किंवा बंदीस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे, खेळाचे मैदानी व इतरत्रही सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग, वापर व सॅनिटायझेशन बंधनकारक आहे. तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस अनिवार्य आहेत. याचे उल्लंघन करणान्यास ५०० रुपयांचा दंड आकारावा असे निर्देश ग्रामसेवक, मुख्याधिकारी, आयुक्त व पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

loading image
go to top