‘त्या’ विदेशी १२ तबलीगीवर गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : इंडोनेशिया व दिल्ली येथून आलेल्या व शहराच्या देगलुर नाका परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आपले अस्तित्व लपवून राहणाऱ्या १२ जणांवर विविध कलमान्वये सोमवारी (ता. सहा) रात्री उशिरा इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण सध्या डॉक्टरच्या निगराणीखाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी इतवारा परिसरात राज्य राखीव पोलिस बलाची कंपनी तैनात केली आहे. 

दिल्ली हजरत निझामुद्दीन येथील मरकत कार्यक्रमात ता. दोन मार्च ते आठ मार्चदरम्यान सहभागी झाले होते. यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेले इंडोनेशिया या देशातील दहा जण आणि दिल्ली येथील एक दाम्पत्य असे बारा जण ता. १५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता रेल्वेने नांदेडला आले. शहराच्या देगलुर नाका परिसरात ते वेगवगेळ्या ठिकाणी वास्तव्यास होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे पासपोर्ट व व्हिसा असल्याने त्यांनी संबंधीत जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा जिल्हा विशेष शाखेत माहिती देणे आवश्‍यक होते. मात्र त्यांनी माहिती न देता ते आपले अस्तित्व लपवून शहराच्या ता. तीन ते. चार मार्च दरम्यान रहेमतनगर भागात राहिले. गुप्त माहितीवरुन पोलिसांनी त्यांना पाच एप्ल रोजी ताब्यात घेतले. 

धर्मगुरूवर गुन्हे दाखल करु नका म्हणणाऱ्यांना चपराक

त्यानंतर एका गटाने पोलिसांवर दबाव टाकून आमच्या धर्मगुरूवर गुन्हे दाखल करु नका अशी दर्पोक्ती दिली. मात्र त्यावेळी पोलिसांनी समयसुचकता दाखवत वेळ काढली. या बारा जणांचे मोबाईल सीडीईर व एसडीआर काढून घेतले तर ते वेगवेगळ्या भागात राहत असल्याचे समजले. त्यांच्याकडील पासपोर्ट व व्हिसा हा सन २०२० ते २०२४ पर्यंत चालणारा आहे. ते ता. दोन मार्च ते आठ मार्च मरकत, त्यानंत ते नऊ मारच रोजी जुनी दिल्ली येथील कुवा मशिदीमध्ये वास्तव्यास होते. ता. ११ मार्च रोजी दुसऱ्या ठिकाणी तर ता. १३ मार्च रोजी नांदेडकडे निघाले. ते ता. १५ मार्चला नांदेडला पोहचले.

विविध कलमानुसार इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल

या बारा जणाविरुद्ध फौजदार बाळू गिते यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात भादवीच्या कलम १८८, २६९, २७० सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ च्या कलम १४ सह साथरोग प्रतिंबधक अधिनियम १८९७ च्या ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पठाण करत आहेत.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com