तुळजापुरातील गायरान क्षेत्रास लागली भीषण आग, दुसऱ्यांदा घडली घटना

Forest Fire In Tuljapur
Forest Fire In Tuljapur

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाशेजारील गायरान क्षेत्रास आग लागल्याची घटना सोमवारी (ता.१५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर वाढत होती. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयानजीक असणाऱ्या वनक्षेत्रावर आग लागली. आग भयावह होती. महाविद्यालयातील कम॔चारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कम॔चारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरत होते.

महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. अनेक प्राध्यापकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच नगरपालिकेस भ्रमणदूरध्वनीद्वारे वनक्षेत्रास आग लागल्याची माहिती दिली. येथील वनखात्याचे कम॔चारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरपालिकेचा अग्निशामक बंब घेऊन सुनिल कदम आले.

अनेक पक्षी आणि प्राणी भक्ष्यस्थानी गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रशासनाच्या सूत्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता निश्चित नुकसान किती झाले याची आकडेवारी मिळू शकली नाही. तुळजापूरचे वनपाल संजय शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील २५ कम॔चारी घटनास्थळी गेले आहेत असे त्यांनी सांगितले.


दुसऱ्यांदा घटना
यापूर्वी ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयानजीकच्या वनक्षेत्रात आग लागण्याची घटना घडली होती. तथापि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज दुसऱ्यांदा आग लागली आहे. सदरचे क्षेत्र गायरानामध्ये येते. डोंगराच्या वर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे. तर गायरानाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत.


दोन घुबडे वाचली
आजच्या आगीमध्ये अनेक पक्षी भक्ष्यस्थानी गेले असे वाटते. तथापि दोन घुबडे वाचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आग लावणारे कोण होते. याचा शोध लागला पाहिजे. अग्निशामक बंबाचे पाणी घुबडावर फेकून घुबडे वाचवली.

-  पंकज शहाणे, कार्यकर्ते, तुळजापूर
 

आम्ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी तसेच वनखात्यातील कम॔चाऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. घुबडे ही वाचविली आहेत. हानी होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले.
- प्रा. प्रदीप कदम

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com