

Wild Boar Attack in Ardhapur: Two Women Workers Injured
Sakal
अर्धापूर : निमगाव शिवारात (ता अर्धापूर)पपईच्या बागेत निंदणी-खुरपणीचे काम सुरू असताना रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता सात) सकाळी अकरा वाजण्याच्या घडली. या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या असून त्यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे.