जालना - काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली असून गुरूवारी (ता. ३१) मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश होणार असल्याचे श्री. गोरंट्याल यांनी स्वतः जाहीर केले आहे..दरम्यान महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकद वापरून स्वबळावर निवडणुक लढवण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांकडे त्यावेळी मांडू, असे म्हणत भाजप प्रवेशानंतर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि गोरंट्याल यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहे.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कैलास गोरंट्याल हे काँग्रेस पक्षावर नाराज होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून कोणतीच मदत मिळाली नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आपण राजकीय भूकंप घडवणार असे भाकीत करत मागील दोन महिन्यांपासून श्री. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशांची चर्चा रंगत होती..प्रथम भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत बैठका झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्याकडे भाजप प्रवेशासंदर्भात श्री. गोरंट्याल यांच्या बैठका झाली. त्यानंतर अखेर भाजप नेते रावसाहेब दानवे, अशोकराव चव्हाण, अतुल सावे यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाची वाट कैलास गोरंट्याल यांनी मोकळी केली आहे.मंगळवारी (ता. २९) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की भाजप जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे आणि अतुल सावे यांनी फोन करून गुरूवारी (ता. ३१) भाजप पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे सांगितले. मुंबई येथील भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात हा प्रवेश होणार असून काँग्रेसमधील माजी नगरसेवकांसह माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन प्रवेश करणार असल्याचे श्री. गोरंट्याल यांनी म्हटले आहे..याच वेळी जालना महापालिका निवडणुकीच्या वेळी महायुती म्हणून एकत्र न लढता स्वतंत्र मनपा निवडणूक लढवावी, अशी भूमिका पक्षातील नेत्यांकडे मांडू असे श्री. गोरंट्याल यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप प्रवेशानंतर महायुतीमधील घटक पक्ष शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांचे राजकीय वर्चस्वाची लढाई कायम राहणार असल्याचे चित्र आहे..कोण आहे कैलास गोरंट्याल- मागील ३५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय असलेले काँग्रेसचे नेते- १९९९, २००९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर जालना विधानसभेतून आमदार म्हणून निवडूण आले.- १९९९ ते २०२४ सलग सहा विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार म्हणून कैलास गोरंट्याल यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले.- सध्या ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर आहेत.- मागील दहा वर्षांपासून तत्कालीन जालना नगरपालिकेवर श्री. गोरंट्याल यांची एकहाती सत्ता राहिली.- कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल पाच वर्ष नगरपालिकेत जालना शहराच्या नगराध्यक्षा म्हणून काँग्रेसकडून निवडून आल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.