
गेवराई- बीडमधील गेवराईच्या बोरीपिंपळगाव येथील माजी उपसरपंच काही खासगी कामानिमित्त शहरात आले असताना, त्यांना काही अज्ञाताकडून जबर मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयासमोर घडली. एवढेच नाहीतर स्विफ्ट डिजायर कारची फोडाफोड करुन या उपसरपंचाचे अपहरण करण्याचा देखील प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली आहे.