
Beed Crime
esakal
गेवराई (जि. बीड) : लुखामसला (ता. गेवराई) येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. बाहेर जाताना तो कधी साधी काठीही घेऊन जात नव्हता. मग, त्याच्या कारमध्ये पिस्तूल आले कुठून, असा आरोप करीत त्याने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.