badamrao pandit and vijaysinh pandit
sakal
गेवराई - शिवसेना (युबीटी) पक्षाकडून विधानसभा निवडणूकीत पराभव झालेले बदामराव पंडित यांनी अखेर भाजप पक्षात प्रवेश केला. प्रवेश होताच ते आक्रमक झाले असून, विजयसिंह पंडित हे एक अचानक अन् पैशाच्या जोरावर झालेले आमदार आहेत. आमदार विजयसिंह असले तरी कारभार मात्र त्यांचे भाऊ करत असल्याची टीका गेवराईचे माजी आमदार बदामराव यांनी प्रसार माध्यमात बोलताना केली.