Latur News : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

Latur News : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची आत्महत्या

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते चुलत भाऊ आहेत. चाकूरकरांच्या भावाचे नाव चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या आहे. चंद्रशेखर चाकूरकर हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही जवळच्या व्यक्तींना 'गूड बाय' असा मॅसेज केला होता.

चंद्रशेखर चाकूरकर यांनी आधीच आत्महत्या करण्याचा निश्चय केला असल्याचं समोर आलं आहे. कारण आज सकाळी जेव्हा ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले, त्यानतंर त्यांनी स्वताच्या मोबाईलवरुन जवळच्या व्यक्तींना 'गूड बाय' असा मॅसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी 'गूड बाय' स्टेटस ठेवला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

वयोमानानुसार त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. त्यामुळे ते सततच्या आजारपणाला कंटाळून गेले होते. तर घरात सून मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी एकांत जागा म्हणून चाकूरकर यांच्या घरातील हॉलमध्ये आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तर चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर चाकूरकर यांची बायपास सर्जरी झाली होती. त्यांना अनेक व्याधी होत्या. सततच्या आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. 

टॅग्स :Latur