esakal | जालन्यात ४५ गावरान कोंबड्या दगावल्याने एकच खळबळ, पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविले नमुने

बोलून बातमी शोधा

Jalna Latest News Chickens Died}

दरम्यान पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून मृत कोंबड्याचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.

जालन्यात ४५ गावरान कोंबड्या दगावल्याने एकच खळबळ, पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविले नमुने
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना तालुक्यातील मानेगाव येथील एकाच रात्री तब्बल ४५ गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला आहे का ? या तपासणी करण्यासाठी पशुसंर्वधन आयुक्त कार्यालयाकडून मृत कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी सोमवारी (ता.आठ) पुणे प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी एक किलोमीटर परिसरात सतर्क भाग म्हणून घोषित केला आहे.


जालना तालुक्यातील मानेगाव येथे गणेश लाखे यांनी घरी ६० गावरान कोंबड्याचे पालन केले आहे. मात्र, या कोंबड्यातील ४५ गावरान कोंबड्यांचा रविवारी (ता.सात) रात्रीतून मृत्यू झाल्याचे माहिती पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून मृत कोंबड्याचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या नुमन्यांचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर या ४५ गावरान कोंबड्यांचा मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त अमितकुमार दूबे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पुण्याहून गावाकडे आईला भेटायला चाललेल्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू


एक किलोमीटरचा परिसरात सतर्क
मानेगाव येथे ४५ गावरान कोंबड्या दगावल्याने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मानेगाव येथील एक किलोमीटरचा परिसर सतर्क भाग म्हणून घोषित केला आहे.  या परिसरात जिवंत व मृत कोंबड्या, अंडी विक्री व वाहतूक करण्यास मनाई आदेश श्री.बिनवडे यांनी सोमवारी (ता.आठ) दिले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर