उदगीर, (जि. लातुर) - शहरात शरीराविषयक गुन्हे करणारे व टोळीने एकत्र येवून गुन्हे करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक लातूर यांनी आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने उदगीर शहरातील पोलीस डायरीत गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या चार आरोपींना लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी काढले आहेत.