बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्यात चार कृषी अधिकारी निलंबित

प्रवीण फुटके
Thursday, 10 December 2020

जलयुक्त शिवार घोटाळ्यांमध्ये आतापर्यंत तालुक्यातील कृषी खात्याचे ३२ अधिकारी निलंबित व १६७ कंत्राटदारांवर व मजुर संस्थेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत.

परळी वैजनाथ (जि.बीड) ः जलयुक्त शिवार घोटाळ्यांमध्ये शुक्रवारी (ता. ) सध्या शिरूर येथे कार्यरत असलेले तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री. मिसाळ यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

जलयुक्त शिवार घोटाळ्यांमध्ये आतापर्यंत तालुक्यातील कृषी खात्याचे ३२ अधिकारी निलंबित व १६७ कंत्राटदारांवर व मजुर संस्थेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी १८ आँगस्ट २०१६ ला तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावेळी चौकशी करून ८८३ कामापैकी ३०७ कामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८ कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आला.

कळंबजवळ तीन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या लोकायुक्त कार्यालयात प्रकरण न्यायप्रविष्ट होते. राहिलेली कामे तपासण्या संदर्भात वसंत मुंडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन, ६ अधिकाऱ्यांचे निलंबन व २५ गुत्तेदार मजुरसंस्थांकडून ४१ लाख रुपये वसूल करण्यासंदर्भात आदेश काढून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असताना स्थानिक व जिल्ह्यातील राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल करण्यास विलंब करण्यात आला. श्री. मुंडे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे विभाग विधानमंडळातील प्रश्न उत्तर महालेखा विभागामार्फत ऑडिट ची मागणी केली. त्यावर शासनाने दखल घेऊन एसआयटीची समिती नेमण्यात आली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four agriculture officers suspended in Beed district in Jalyukt Shivar scam