कळंबजवळ तीन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

दिलीप गंभीरे
Thursday, 10 December 2020

या मार्गाचे चारपदरी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.त्यामुळे शहरापासून ते येरमळा मार्गावर तीन किमी अंतरापर्यत एकेरी वाहतूक सुरू आहे.

कळंब: तीन दुचाकीमध्ये समोरा-समोर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्य झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना कळंब येरमळा रस्त्यावर पेट्रोल पंपा समोर बुधवार( ता.९) रात्री सात वाजण्याच्या सुमार घडली. कळंबहून किरण सुतार (वय-२६) रा इटकुर भाग्यवंत क्षीरसागर (वय-३८) रा मांडवा तालुका वाशी हे दुचाकीवरून  येरमळा रस्त्याने गावाकडे निघाले होते.

याच मार्गावरून तालुक्यातील भाटशिरपूरा येथील रामराजे गाढवे (वय-३२) सौंदना ता.कळंब येथील अनंत पालकर (वय-४५) हे दुचाकीवरून कळंब च्या दिशेने येत होते.पेट्रोल पंपासमोर दुचाकीला समोर समोर धकड लागली यामध्ये तिघेजण ठार झाले.

खबरदार! वाहने सुसाट पळवाल तर...

या मार्गाचे चारपदरी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.त्यामुळे शहरापासून ते येरमळा मार्गावर तीन किमी अंतरापर्यत एकेरी वाहतूक सुरू आहे.शिवाय कंत्राटदाराने आपले काही जणांचा लाड पूरविण्यासाठी या मार्गरील रस्ता ओलांडण्यासाठी जागा सोडली आहे.त्यामुळे इकडून तिकडे वाहने टर्न मारणे सोयीचे झाले आहे.त्यामुळेच बुधवारी झालेल्या दुचाकीच्या तिहेरी अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची दुःखत घटना घडली आहे.सर्व जखमींना येथील उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.यात सौंदना येथील अनंत पालकर याचा मृत्यू झाला असून औषधउपचारासाठी भाटशिरपूरा येथील रामराजे गाढवे याला आंबाजोगाईच्या शासकीय रुग्णलयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

शेवटी काळाने झडप घातलीच- 
येरमळा मार्गावरील पेट्रोल पंपासमोर दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात वाशी तालुक्यातील मांडवा येथील भाग्यवंत क्षीरसागर गंभीर जखमी झाल्याने त्याला कळंबच्या रुग्णवाहिकेतून उस्मानाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यासाठी नेहत असताना रुग्णवाहिकेचा व पिकपचा समोरासमोर ढोकी जवळ अपघात झाला.त्यात अपघातग्रस्त क्षीरसागर याचा मृत्यू झाला तर रुग्ण वाहिकेचा चालकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे दोघे युवक जेरबंद

चारपदरी रस्त्यावर वळणे घेण्यासाठी जागा का सोडली?
कळंब येरमळा रस्त्याचे चारपदरी रस्त्याचे काम सुरू आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी इकडून तिकडे वाहने वळविण्यासाठी २० फुटाचे अंतर सोडले आहे.त्यामुळे सुसाट वाहतूक सुरू असतानाही वाहने टर्न घेऊन इच्छास्थळी मार्गस्थ होतात. ही धोकादायक बाब असतानाही कुणाचे तरी लाड पुरविण्यात कंत्राटदार धन्यता मानत आहे.चारपदरी रस्त्यावरून इकडून तिकडे ये-जा करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने कुठे जागा सोडायची याचे निर्बंध रस्ते कामाच्या अंदाजपत्रकात घालून दिलेले आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three people killed near Kalamb in accident