औंढा नागनाथ शहरात चार दिवसाच्या जनता कर्फ्यूला सुरुवात

राजेश दारव्हेकर
Sunday, 13 September 2020

सकाळी सात वाजता ग्रामीण भागातील दूधवाले हे औंढा शहरात आले . शहर बंद असल्या कारणास्तव ते परत गेले . यासह बसस्थानक, शासकीय कार्यालयात देखील शुकशुकाट होता.

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली)  : येथे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार पासून ता. १२   चार दिवस व्यापारी संघटना नागरिक तसेच नगरपंचायत तर्फे जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे . त्यामुळे आज दररोज गजबजलेल्या शहरात सकाळी सर्वत्र बाजारपेठ मध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. 

सकाळी सात वाजता ग्रामीण भागातील दूधवाले हे औंढा शहरात आले . शहर बंद असल्या कारणास्तव ते परत गेले . यासह बसस्थानक, शासकीय कार्यालयात देखील शुकशुकाट होता.

शनिवारपासून ता. १२ ते मंगळवार (ता. १५)  या कालावधीमध्ये जनता कर्फ्यू

शनिवार पासून ता. १२ ते मंगळवार (ता. १५)  या कालावधीमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून नागरिकांनी या कालावधीत  शासनाने कोरोनाच्या संदर्भात दिलेले नियमाचे पालन करावे .घराबाहेर पडू नये जर अती महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर  पडावे तसेच  मास्क आणि सँनिटायझरचा  वापर करून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालनही करावे. विनाकारण घराबाहेर पडूनये असे आवाहन नगरपंचायत तर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा - नांदेड : रेल्वेमध्ये पार्सलची सुद्धा ऍडव्हान्स बुकींग करता येणार, नवीन सुविधेचे स्वागत

नागरिक देखील स्वतः ची काळजी घेत आहेत

मागच्या काही दिवसांपासून  कोरोनाचे रुग्ण शहरासह  तालुक्यात  झपाट्याने वाढत असल्या कारणास्तव जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. जनता कर्फ्यू मुळे औंढा नागनाथ शहरातील बाजारपेठ मध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाला. यापूर्वी देखील शहरात स़ंचारबंदी लागु करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यासह व्यापारी विविध दुकानदार यांच्या देखील कोरोना तपासणी करण्यात आली आहे. सध्या शहरात विविध प्रभागात नागरिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत. नागरिक देखील स्वतः ची काळजी घेत आहेत. बाहेर जाताना तोंडाला मास्क ब़ाधने वेळोवेळी सँनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. विविध शासकीय कार्यालयातही सँनिटायझरचा वापर होत आहे. मात्र रुग्णाची वाढती संख्या यामुळे येथे चार दिवसाचा जनता कर्फ्यू लागु  केला आहे त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A four-day public curfew begins in Aundha Nagnath hingoli news