Video : आगीत चार घरे भस्मसात

 आगीत भस्सात झालेली घरे
आगीत भस्सात झालेली घरे

परभणी : शहरातील औद्योगिक वसाहत परिसर जवळ असलेल्या अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये  शॉर्टसक्रीटने लागलेल्या आगीत चार घर भस्मसात झाल्याची घटना सोमवारी (ता.२३) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जिवित हाणी झाली नाही.

परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील अहिल्यादेवी होळकर नगरमधील एका घरात सोमवारी (ता.२३) अचानक आग लागली. घर लाकडी पार्टीशनचे असल्याने घरातील साहित्य तातडीने जळाले. ही आग आटोक्यात आनेपर्यंत बाजूलाच असलेल्या दुसऱ्या घराने ही पेट घेतला. पाहता पाहता एकमेकांना लागून असलेल्या चार घरांनी पेट घेतला. आगीने रौद्र रुप धारण केल्याने आग विझविणे अवघड होऊन बसले होते. तरीही आग विझविण्याचा नागरिकांकडून प्रयत्न होत होता. अग्रीशमन दलाची गाडी घटनास्थळापर्यंत येइपर्यंत चारही घरे जळून खाक झाली होती. आगीने नुकसान झालेल्या घरमालकांची नावे भुंजग बाबुराव खंदारे, जगदीश राजेश पांचाळ, रामभाऊ रेशमाजी कांबळे व विठ्ठल पांचाळ अशी आहेत. हे चारही जण सचिन अशोक मुस्तादर यांच्या जागेत किरायाणे राहत होते.

होळकर नगरात एकच गोंधळ
अगीने रौद्ररुप धारण केल्याने अहिल्यादेवी होळकर नगर परिसरात एकच गोंधळ उडाला. जो - तो आग विझविण्यासाठी धावत होता. चारही घरे बंद असल्याने घरातील साहित्य बाहेर काढण्यास ही तेथील नागरीकांना अडथळा येत होता. 

चारही जण कामगार
या घरात राहणारे सर्वच जण कामगार होते. त्यामुळे सर्वचजण सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. त्यात आग लागल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे मोठ्याप्रमाणात कामगारांचे नुकसान झाले आहे. या घटनेने कामगारांचे कुटुंबफ हवालदिल झाले आहेत.

नवामोंढा पोलिसांची मदतीसाठी धाव
घटनेची माहिती कळताच नवामोंढा पोलिस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळाकडे धावले. पोलिस व नागरीकांनी मिळून आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतू आगीने चारही घरे वेढल्याने या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. आग लागल्याचे समाजताच शहरात चर्चेला उधाण आले होते. या वेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com