शेतकऱ्याचा मुलगा झाला न्यायाधीश

 विष्णू गीते
विष्णू गीते

जिंतूर (जि.परभणी) : निरक्षर शेतकऱ्याचा मुलगा विष्णू गीते हा इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर यश मिळवत न्यायाधीश झाला. त्याचे हे यश जिंतूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

२०१९ या वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा शनिवारी (ता.२१) निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बेलखेडा (ता.जिंतूर) विष्णू गीते यांची न्यायाधीश पदाकरिता निवड झाली. बेलखेडा या छोट्याश्या गावातील शेतकरी व एका खासगी बांधकाम कंपनीतील सेवानिवृत्त कमगार आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले दत्ताराव निवृत्ती गीते यांचा मुलगा विष्णु गीते हा आहे.

तीस वर्षापूर्वी गाव सोडण्याचा निर्णय

कामाच्या शोधात दत्ताराव गिते यांनी अल्पशा शेतीवर  कुटुंबाची गुजराण, मुलांचे शिक्षण होत नसल्याने तीस वर्षापूर्वी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. स्वतः निरक्षर असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणास प्रथम प्राधान्य दिले. त्यानुसार विष्णु गीते यांनी माध्यमिक व कला शाखेत (बीए) पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरनंतर पुण्यातील आय. एल. एस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सन २०१२ साली वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. पुणे येथील बी. ई. आव्हाड लॉ क्लासेसचे प्रा. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार विष्णु गीते यांनी रात्रंदिवस मेहनत करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची  तयारी केली. या परिक्षेत यश मिळविले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


हेही वाचा :  न्यायाधीशपदावर नांदेड, परभणी, हिंगोलीचा दबदबा
.
विष्णू न्यायाधीश झाल्याचा आनंद
आईवडील व पत्नी यांच्यासह संपूर्ण गीते परिवाराच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. याबद्दल बोलताना दत्तराव गीते म्हणाले,
बेलखेडा शिवार सधन नाही. थोडीफार शेती पण पोट भरणे कठीण म्हणून पुणे गाठलं, हाताला मिळेल ते काम केले. मोळी विकू पण लेकरांना शिकवू हाच ध्यास मनी होता. विष्णूसाठी आम्ही खूप मेहनत घेतली. वकील झाला, नक्की पुढे न्यायाधीश होईल, आमच्या कष्टाला फळ मिळेल असं वाटत होतं. अन् तो दिवस आज उजाडला.


ध्येय निश्चित करा
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीला सामोरे जात स्वतःशी प्रामाणिक रहावे., आपल्यातील उणिवा कठोर परिश्रमाने दूर करा. ध्येय निश्चित करा. यश नक्कीच मिळेल.
 विष्णू गीते, विधिज्ञ


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com