उस्मानाबादसह चार तालुके गुढ आवाजाने हादरले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

गुढ आवाजाने उस्मानाबाद शहरासह परिसरातील चार तालुके हादरले. मंगळवारी (ता.19) दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी हा आवाज जाणवला.

उस्मानाबाद : गुढ आवाजाने उस्मानाबाद शहरासह परिसरातील चार तालुके हादरले. मंगळवारी (ता.19) दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी हा आवाज जाणवला.

उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा व कळंब तालुक्‍यांमध्ये आवाज जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर मात्र या गुढ आवाजाची नोंद झाली नाही. त्यामुळे हा भूकंप नसून गुढ आवाज असल्याचे बोलले जात आहे. शहरासह जिल्ह्याला गेल्या दहा वर्षांपासून असे आवाज जाणवत आहेत. मंगळवारी दुपारी झालेल्या आवाजाची तीव्रता मात्र मोठी होती. आवाज होताच खिडक्‍यांची तावदाने हादरली. काही नागरिक भूकंप असल्याचा समजत घराबाहेर पडले. विविध शासकीय कार्यालयातही आवाज जाणवल्याचे कर्मचारी सांगत होते.

औरंगाबादमध्ये हे काय घडले : रात्री गेली बर्थडे पार्टीला, मित्राने पाजले गुंगीचे औषध, मग... 

दरम्यान आवाजाच्या तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. कशाचा आवाज आहे, भूकंप आहे, अशी चर्चा नागरीक एकमेकांमध्ये करीत होते. हा आवाज आकाशातील सुपरसॉनिक विमानांनी झेप घेतल्यानंतर होत असल्याचे बोलले जात आहे. अशा आवाजातून धोका नसला तरी आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे लहान मुलासह वयोवृद्ध मंडळी ही चांगलीच घाबरली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The four talukas, including Osmanabad were shaken with a loud noise