रात्री गेली बर्थडे पार्टीला, मित्राने पाजले गुंगीचे औषध, मग...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

  • संशयित तरुण अटक 
  • पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

औरंगाबाद - मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सतरा वर्षीय मुलीला त्याने सोबत नेले. तिला पार्टीत कोल्ड्रिंक्‍समधून गुंगीचे औषध पाजलं. त्यानंतर रात्री फ्लॅटमध्येच तिच्यावर दोनवेळा अतीप्रसंग केला. मुलीने घरी येऊन आपबिती सांगितल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी संशयित तरुणाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आकाश प्रकाश ठोकळ (वय 19, रा. चिकलठाणा) असे अटकेतील संशयित तरुणाचे नाव आहे. मुलगी व तो तरुण एकाच शाळेत शिक्षणासाठी होते. तेव्हापासून त्यांची मैत्री होती. सिडको, एन-4 भागातील 17 वर्षीय मुलगी 14 नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास किराणा दुकानात दूध आणण्यासाठी गेली होती. त्यानंतर मात्र ती
घरी परतली नाही. अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. मैत्रिणी, नातेवाईक व मॉलमध्येही तिचा शोध घेतला.

परंतु तिचा शोध लागला नाही. यानंतर 15 नोव्हेंबरला दुपारी बाराच्या सुमारास मुलगी घरी परतली. त्यावेळी कुटुंबियांनी तिची विचारपूस केली असता तिने सांगितले की, मित्र आकाश ठोकळ याने सनी नावाच्या दुसऱ्या मित्राच्या वाढदिवस आहे, असे सांगितले. सगळे मित्र देवळाई चौकातील एका किरायाच्या फ्लॅटमध्ये जमणार आहेत. तिथे वाढदिवस साजरा होणार आहे. त्यामुळे तूसुद्धा माझ्यासोबत चल असे तो म्हणाला.

मी त्याला सोबत येण्यासाठी नकार दिला होता. मात्र, त्याने जबरीने दुचाकीवर बसविले व वाढदिवसाला देवळाईचौकातील त्या फ्लॅटवर नेले. रात्री वाढदिवस साजरा केला. त्यादरम्यान आकाशने कोल्ड्रिंक्‍स पाजले. त्यात गुंगीचे औषध होते. यानंतर फ्लॅटच्या एका खोलीत आकाशने दोनवेळा अतिप्रसंग केला. सकाळी झालेल्या प्रकाराबाबत लक्षात आले. यानंतर घर गाठले.'' अशी बाब तिने कुटुंबियांना सांगितली. 
 
झाली अटक 
या प्रकाराने हादरलेल्या कुटुंबियांनी मुलीसोबत पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयित तरुणाविरुद्ध बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अटक करण्यात आली. यानंतर संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली. 
  
मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी 
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी सांगितले की, मुलगी अल्पवयीन असून या प्रकरणात तिच्या पालकांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

वाचावे असे असे का : MONDAY POSITIVE : शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस धूमधडाक्‍यात

हेही वाचा : पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

हे वाचले का? : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape in Birthday Party at Aurangabad