Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीवरून मानवत तालुक्यातील कोल्हा येथे आंदोलनाचा भडका उडाला.
Four Youths Climb Water Tank Over Maratha Reservation Demand

Four Youths Climb Water Tank Over Maratha Reservation Demand

sakal

Updated on

- सत्यशील धबडगे

मानवत - मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीवरून मानवत तालुक्यातील कोल्हा येथे बुधवारी (९ सप्टेंबर) आंदोलनाचा भडका उडाला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत गावातील चार युवकांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून सरकारचे लक्ष वेधले. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com