esakal | लांडग्यांच्या हल्ल्यात चौदा शेळ्यांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

लांडग्यांच्या हल्ल्यात शेळ्या ठार

सारोळा (ता.सिल्लोड) येथील शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात चौदा शेळ्यांचा मृत्यू   झाल्याची घटना मंगळवारी (ता.दोन) पहाटे एकच्या सुमारास घडली. गट क्रमांक 78 मध्ये भगवान शिवाजी दळवी यांचे शेत आहे. त्यात ते बंदिस्त शेळीपालन करतात. मंगळवारी पहाटे त्यांच्या शेतात 5 ते 6 लाडग्यांच्या कळपाने शेळ्यांवर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला.

लांडग्यांच्या हल्ल्यात चौदा शेळ्यांचा मृत्यू

sakal_logo
By
अमाेल ताेंगल

रहिमाबाद, ता.2 (जि.औरंगाबाद) : सारोळा (ता.सिल्लोड) येथील शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात चौदा शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.दोन) पहाटे एकच्या सुमारास घडली. गट क्रमांक 78 मध्ये भगवान शिवाजी दळवी यांचे शेत आहे. त्यात ते बंदिस्त शेळीपालन करतात मंगळवारी पहाटे त्यांच्या शेतीमध्ये 5 ते 6 लाडग्यांच्या कळपाने शेळ्यावर हल्ला करत शेळ्यांचा फडशा पाडला.

पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याच्या शोधात वस्त्यांकडे येणारे प्राणी आतापासून लोकांची दहशत वाढवीत आहे. आता जंगलामध्ये पिकांच्या वाढीमुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी जागा मिळत असल्याने हिंस्त्र पशु शेळ्यांची शिकार करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. बऱ्याचदा हे प्राणी कळपांनी मानवीवस्तीकडे येत असल्याने पशुपालाकांची भीती आतापासूनच वाढली आहे.  

loading image
go to top