
वसमत : वसमत येथे मुथुट मायक्रोफिन लिमीटेड कंपनीच्या संपर्क अधिकाऱ्यानेच गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघड झाला असून ८ खातेदारांची ७५ हजाराची ५९० रुपयाची रक्कम हडपल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २३ रात्री उशीरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसमत येथे मुथुट मायक्रोफिन लिमीटेड कंपनीची शाखा आहे.