वसमत येथे बनावट प्रमाणपत्राव्दारे शासनाची फसवणूक

तपासणीत ४१ प्रमाणपत्र बोगस; एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
fake certificates
fake certificatesSakal

वसमत - उत्पन्न प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल एडीट करुन तब्बल ४१ प्रमाणात बोगस तयार करुन श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी तहसिल कार्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर सदरील प्रकार तपासणीत समोर आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तहसील कार्यालयात विविध लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी अनेक दलाल मंडळी कार्यरत असतात. स्वतहाच्या आर्थिक लाभिसाठी शासनाची व लाभार्थ्यांची सर्रास फसवणूक करत असतात. श्रवणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी चक्क उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल एडीट करुन तब्बल ४१ फाईल तहसिल कार्यालयातील श्रावणबाळ योजना कक्षात दाखल करण्यात आल्या होत्या.

श्रावणबाळ योजनेचे अव्वल कारकून शेख सत्तार आयुब यांनी दाखल फाईल ची तपासणी केली असता सर्वच फाइल चा एकच बारकोड असल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी अधिक माहिती घेतली असता एक उत्पन्नाचे प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल एडीट करुन केवळ लाभार्थ्यांची नावे बदलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच संबंधित व्यक्ती बनावट प्रमाणपत्राव्दारे शासनाची व लाभार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचे सिद्ध झाले. अव्वल कारकून शेख सत्तार आयुब यांनी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी ता. १७ दिलेल्या फिर्यादी वरुन सदरील व्यक्तीने निराधार,वयस्क व अशिक्षित व्यक्तीचा गैरफायदा घेऊन बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार करुन श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी दाखल करुन शासनाची फसवणूक केली म्हणून शहर पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री महिपाळ करीत आहेत.

दरम्यान, श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल केलेल्या निराधार वयस्क व्यक्तींना अधिक तपासणी करण्यासाठी तहसिल कार्यालयात बोलावले असता आम्हाला लिहिता वाचता येत नाही. संबंधित व्यक्तीने श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देतो असे म्हणत आमच्याकडून पैसे घेऊन कागदपत्रे नेली असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com