
लातूर : आषाढी वारीसाठी लाखो भाविक दिंड्यांसोबत पंढरीला जातात. पण, आर्थिक तसेच अन्य काही अडचणींमुळे अनेकांना पंढरीलाही जाणे जमत नाही. अशा गरीब वारकऱ्यांना पंढरीला जाता यावे, म्हणून येथील श्री सत्संग प्रतिष्ठानने पुढाकार घेत मोफत बससेवेचा उपक्रम हाती घेतला.