esakal | सेलूत साकारतेय शंभर बेडचे मोफत कोविड सेंटर- संभाजी ब्रिगेडचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

सेलू कोविड सेंटर

सेलूत साकारतेय शंभर बेडचे मोफत कोविड सेंटर- संभाजी ब्रिगेडचा पुढाकार

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चँरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने येथील हुतात्मा स्मारक समोरील कस्तुरबा गांधी वसतिगृहाच्या सुसज्ज व अद्यावत सोयी सुविधा असलेल्या इमारतीमध्ये शंभर बेडचे मोफत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रविवारी ( ता. २५ ) रोजी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली. शनिवारी ( ता. २४ ) रोजी राज्यमंजी प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते येथील अन्नछत्राचे लोकार्पण संपन्न झाले.

लोकसहभागातून कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य व वेळेवर उपचार मिळावे व कोविडची साथ लवकर आटोक्यात आणण्यासाठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोफत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणारे सेलूतील बळीराजा कोविड सेंटर महाराष्ट्रातील पहिले सेंटर ठरणार आहे. अनेक दानशुरांनी या सेंटरला मदतीचा हात देऊ केला असून कोरोनाग्रस्तांना पोषक आहार मिळावा यासाठी अन्नछत्राचे लोकार्पण राज्याचे नगरविकास, ऊर्जा व आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी ( ता. २४ ) रोजी करण्यात आले.

हेही वाचा - लोह्यातील हृदयद्रावक घटना; वडीलानंतर अवघ्या दीड तासात मुलगा कोरोनाने हिरावला

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे, तालूकाध्यक्ष सर्जेराव लहाने, डॉ. संजय रोडगे, विनायक पावडे, रणजित गजमल, नामदेव डख, अविनाश शेरे, रामराव बोबडे, मिलिंद सावंत, राम मैफळ, शरद मगर, माधव गव्हाणे, गोविंद काष्टे, पांडुरंग कावळे, पारस काला, शरद ठाक्कर, वसंत बोराडे,कृष्णा रोडगे, रामेश्वर शेरे, महेश मुसळे, शशांक टाके, शरद घोरपडे, विशाल गव्हाडे, संतोष शिंदे, उत्तम डोंबे, निलेश शिंदे आदींची उपस्थिती होती.

दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावे...

सेलूतील शंभर बेडच्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये गोरगरिबांना उपचार देण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये औषधोपचार व पोषक आहाराची व्यवस्था करण्यात आली असून समाजातील दानशुरांनी या कोविड केअर सेंटरला आर्थिक अथवा धान्याच्या स्वरूपात मदत करावी असे आवाहन छगन शेरे यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे