
माजलगाव : घरची हलाखीची परिस्थिती आणि शिक्षणाच्या अभावामुळे चांगली नोकरी करण्याची इच्छा असूनही ती करता आली नाही. मात्र, येथील मोंढ्यात हमालीचे काम करून आपला उदारनिर्वाह करणाऱ्या राहुल साळवे याने जिद्दीने मुलांना उच्च शिक्षण दिले. आज दोन्ही मुले संभाजीनगर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून, आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.