Success Story : हमालीचे पोते उचलताना आला फोन, ‘बाबा मी फौजदार झालो; पिठ्ठी येथील कष्टकरी कुटुंबातील राजेशचे एमपीएससी परीक्षेत यश
Inspiring Journey : कष्टकऱ्यांच्या कुटुंबातील राजेश निर्मळने त्याच्या मेहनतीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्याचे यश त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाचे प्रतीक आहे.
बीड : घरची परिस्थित बेताची. वडील कारखान्यावर हमाल तर आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून गुजराण करते. आपल्या पालकांचा चाललेला अविरत संघर्ष पाहून पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गावच्या राजेश निर्मळने अभ्यासासह मैदानी कसरतींवर भर दिला.