Revenue Assistant : भाजीपाला विकता विकता त्याने घातली यशाला गवसणी

केदारकुंठ्याच्या निलकांत कांबळेच्या खडतर प्रवासाची यशोगाथा...
Nilkant kamble
Nilkant kamblesakal
Updated on

देगलूर - कोविड काळात एसटी महामंडळातून निवृत्त झालेले वडील, त्यातच आईला कॅन्सर ने घेराव घातलेला, वडिलांची सेवानिवृत्तीची उरली सुरली आर्थिक पुंजी वैद्यकीय उपचारावर खर्च झालेली. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या गाडा हाकलण्यासाठी पुन्हा वडिलांनी दुकान टाकून संसाराला हातभार लावत होते. घरची परिस्थिती बघून नीलकांत कांबळे यांनेही बाजारात भाजीपाला विकू लागला.

आपण घेतलेले शिक्षण वाया जाता कामा नये म्हणून अशा परिस्थितीत नीलकांत कांबळे यांने पदवी शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षाकडे आपला मोर्चा वळविला. कसेही करून यश गाठायचेच म्हणून अभ्यासात सातत्य ठेवत राहिला. लोकसेवा आयोगाच्या वर्ग दोन पदाने त्याला अनेकदा जवळून हुलकावणी दिली. मात्र त्याने हार मानली नाही.

भाजीपाला विकणारा कधी अधिकारी होतो का? असेही टोमणे समाजातून त्याला खावे लागले, तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत आपली वाटचाल सुरूच ठेवल्याने केदारकुंठ्याच्या निलकांत कांबळेला पाच वर्षाच्या संघर्षानंतर मनी बाळगलेले उचित ध्येय अखेर फेब्रुवारी २०२५ साली गाठता आले.

तालुक्याच्या अडवळणी असलेले केदारकुंठा गावच्या निलकांत कांबळे ची एकूणच जीवनातील खडथर वाटचाल. बघता तो कधी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होईल का? ही कल्पनाच करवत नाही. कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी त्या काळात वडील गंगाधर नरसींग कांबळे हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पोटाला चिमटा घेत दोन मुले, व एक मुलगी यांना आहे त्या परिस्थितीत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

मध्यंतरी घरात आजारासंदर्भाने अनेक संकटे आली. आईच्या उपचारासाठी आर्थिक ओढाताण झाली. तरीही एक मुलगा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पी.एच.डी. करतो आहे. तर मुलगी पी.एच.डी.साठी पात्र झाली आहे. नीलकांत याचे प्राथमिक शिक्षण केदारकुंठा तर माध्यमिक शिक्षण देगलूर येथील मानव्य विकास विद्यालयात झाले.

अकरावी बारावीचे शिक्षण त्याने देगलूर येथील छत्रपती शिवाजी कॉलेज मधून पूर्ण केले तर देगलूर महाविद्यालयातून त्यांने कला शाखेची पदवी प्राप्त केली. या सर्व कठीण काळात त्याने भाजीपाला विकत विकतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. यात त्याला तीन-चार वेळेस अपयश आले. मात्र त्याने जिद्द सोडली नाही.

शेवटी एप्रिल २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये नीलकांत कांबळे हा यशस्वी होत यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल गावकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव असतो. मात्र कुठले क्षेत्र निवडा जिद्द व चिकाटी ठेवून सातत्याने प्रयत्न करीत राहिल्यास यश हमखास पदरी पडते. माझ्या यशात कुटुंबीयासह प्रा. डॉ. राजेश्वर धुडुकनाळे, प्रा. डॉ. माधव चोले, प्रा. डॉ. बालाजी कतुरवार यांच्या मार्गदर्शनाबरोबरच त्यांनी मला संकटकाळी दिलेल्या आर्थिक मदतीचा सिंहाचा वाटा असल्यानेच मी हे यश गाठू शकलो.

- नीलकांत गंगाधर कांबळे, केदारकुंठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com