esakal | नीट परीक्षेसाठी सुरक्षा साधनांचा पुरेपुर वापर, परभणीतून इतरत्र २० बस रवाना...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी येथून नांदेड, औरंगाबाद, लातुर येथे नीट परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी निरोप दिला. या वेळी महेश पाटील आदी. तसेच परभणी येथील अक्षयज्योती विद्यालयात सुरक्षा साधनांसह विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात होता.

नीट परीक्षेसाठी सुरक्षा साधनांचा पुरेपुर वापर, परभणीतून इतरत्र २० बस रवाना...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी शहरासह जिल्ह्यातून रविवारी (ता.१३) सकाळी विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्रासाठी २० बस सोडण्यात आल्या. तर शहरातील चार परीक्षा केंद्रावर सुरक्षेच्या संपूर्ण नियमांचे पालक करून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

संपूर्ण देशभरात नॅशनल टेस्टींग एजन्सी सन २०२० (एनटीए) वैद्यकीय व दंत महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (एनईईटी) रविवारी (ता.१३) आयोजन केले आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील साडेचार हजारावर विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. रविवारी (ता.१३) सकाळी पाच वाजल्यापासून आरक्षण केलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांनी आरक्षण केले नाही, अशा सर्व विद्यार्थी, पालक रवाना झाले.

आगारनिहाय सोडलेल्या बस

परभणी आगारातून नांदेडला आठ, औरंगाबादला पाच, लातुरला जाण्यासाठी तीन बस सोडण्यात आल्या. पाथरी व जिंतुर आगरातून प्रत्येक दोन अशा एकूण २० बस सोडण्यात आल्या. या व्यक्तिरीक्त आरक्षण नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन ते तीन जादा बस सोडण्यात आल्याची माहिती, विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.

हेही वाचा - औंढा नागनाथ शहरात चार दिवसाच्या जनता कर्फ्यूला सुरुवात

शहरात चार परीक्षा केंद्रे

एैनवेळी परभणी शहरात चार परिक्षा केंद्रे देण्यात आली. अरबिंदो अक्षरज्योती विद्यालय, धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठाण, पाथरी रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूल व वसमत रस्त्यावरील हरिबाई वरपुडकर फार्मसी या चार केंद्रात या परीक्षा झाल्या. अक्षरज्योती विद्यालयासह सर्वच केंद्रावर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे चांगल्या प्रकारे प्रबंध करण्यात आले होते. सामाजिक अंतर ठेवूनच विद्यार्थ्यांना दालनात प्रवेश दिल्या जात होता. मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर सर्वांसाठी अनिवार्य होते.

येथे क्लिक करानांदेड : रेल्वेमध्ये पार्सलची सुद्धा ऍडव्हान्स बुकींग करता येणार, नवीन सुविधेचे स्वागत

विद्यार्थ्यांची ससेहोलपट कायम
कोरोना संसर्गात तरी जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळेल असे अपेक्षीत होते. परंतु ऐनवेळी चार परीक्षा केंद्रे दिली. साडे तीन हजारावर विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेसाठी नांदेड, लातुर, औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर जावे लागले. बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजसी वाहनांनाच पसंती दिल्याचे दिसून येते. कोरोनातही परीक्षेसाठी त्यांची ससेहोलपट कायम राहिली.

संपादन ः राजन मंगरुळकर