

जालना : महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचे पैसे पडताळणीविनाच लाडक्या भावांच्याही खात्यात पडल्याचे आढळून आले आहे. अशाप्रकारे आलेले पैसे परत करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे सात अर्ज दाखल झाले आहेत.