विद्यार्थीनीसोबत चाळे, गेला तुरूंगात 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

एका अल्पवयीन युवतीचा तिच्या घरी जावून विनयभंग करणाऱ्यास जिल्हा न्यायादीश एस. एस. खरात यांनी तीन वर्षाची शिक्षा सुनावली.

नांदेड : अंगणात झोपलेल्या एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग करणाऱ्यास येथील जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात यांनी तीन वर्ष सक्त मजुरी व रोख एक हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा बुधवारी (ता. २६) सुनावली. 

किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे राहणारी एक १७ वर्षीय युवती नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या महाविद्यालयात गेली. महाविद्यालयातून ती घरी दुपारी परत आली. यावेळी तीचे आईवडील हिमायतनगर येते रुग्णालयात गेल्याचे तिला समजले. त्यांना परत येईपर्यंत ती आपल्या अंगणातील बाजेवर पहुडली होती.

तीने आपली सुटका करून घेतली

घरी एकटीच असल्याची संधी साधून प्रेमकुमार उर्फ सोपान भिमराव जाधव (वय १९) ता. १७ जुलै २०१७ रोजी तिच्याजवळ गेला. तिच्याशी त्याने चाळे करून विनयभंग केला. एवढेच नाही तर तिला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या तावडीतून तीने आपली सुटका करून घेतली. लगेच तीने आपल्या स्नानगृहात लपली व दरवाजा लावून घेतला. दरवाजा उघडण्यासाठी तो तिला धमकी देत होता. यावेळी बाहेर गेलेली तीची आई घरी परत येत असल्याचे पाहून प्रेमकुमार ह्याने तेथून पळ काढला. 
हेही वाचानांदेड जिल्ह्यात पुन्हा एका बालिकेवर अत्याचार

प्रेमकुमार जाधवविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

घडलेला प्रकार तीने आपल्या आईला सांगितला. सायंकाळी पीडीत युवतीच्या फिर्यादीवरुन इस्लापूर पोलिस ठाण्यात प्रेमकुमार जाधवविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश महल्ले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात आरोपीला अटक केल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. 

तीन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये रोख दंड

दाखल झालेल्या दोषारोपपत्रानुसार न्यायालयाने पाच साक्षिदार तपासले. पीडीत अल्पवयीन युवतीचा जबाब आणि साक्षिदारांचे साक्ष या त महत्वाचे ठरले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. संजय लाठकर यांनी युक्तीवाद केला. सर्व बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस. एस. खरात यांनी आरोपी प्रेमकुमार जाधव याला तीन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली.  हा निकाल ऐकण्यासाठी इस्लापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने न्यायालयात हजर होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadring with the students, go to jail nanded news