
धाराशिव : टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग सादर करत, पावली खेळत शेकडो वारकऱ्यांसह शेगावहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सकाळी शहरात उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर तीन किलोमीटरपर्यंत रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या; तर चौका-चौकांमध्ये फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.