Ashadhi Wari 2025 : शेगावीचा राणा तुळजापूरनगरी; संत गजानन महाराजांच्या पालखीचे पुष्पवृष्टीने स्वागत
Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तुळजापुरात जोरदार स्वागत करण्यात आले. शहरभर रांगोळ्या, फूलांची वृष्टी आणि भजनाच्या गजरात पालखीच्या आगमनाची भक्तिपंढीने साक्ष दिली.
तुळजापूर : ‘गण गण गणात बोते’. ‘उदो बोला उदो’चा जयघोष करीत शेगावीचा राणा, संत गजानन महाजारांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (ता. २७) शहरात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.