
Ganesh Festival 2025
Sakal
मुरुड : डी जे मुक्त विसर्जन मिरवणूक करण्याच्या पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता पोलिसांनी काढलेल्या नोटीशीलाही केराची टोपली दाखवत डॉल्बीचा दणदणात करत मुरूडमध्ये गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली. गणेश मूर्ती विसर्जनानंतर पोलिसांनी डॉल्बी ठाण्यात आणण्यास सुरुवात केल्यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला डॉल्बी वाले सामान घेऊन पळून गेले. यामुळे हजारोंच्या जमावाने ठाण्यासमोर येऊन याचा जाब पोलिसांना विचारला. या प्रकारामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.