Trishul Ganesh Mandal Usmanpura:
esakal
उस्मानपुरा: गणेशोत्सवात गणरायांची सजावट आणि आरास यामध्ये दरवर्षी नवनवीन कल्पना पाहायला मिळतात. उस्मानपुऱ्यातील पीर बाजार कॉर्नर, येथील श्री त्रिशूल गणेश मंडळाने यंदा आपल्या गणरायाला चक्क अमेरिकन डॉलरच्या नोटांचा आकर्षक हार अर्पण करून अनोखी सजावट केली आहे. तब्बल १३६ अमेरिकन डॉलरच्या नोटांचा हा हार गणरायाच्या गळ्यात सजला असून, त्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.