Ganesh Visarjan 2025
Sakal
मराठवाडा
Ganesh Visarjan 2025 : अंबडनगरीत ढोल, ताशांच्या गजरात व गुलालांची उधळण करत लाडक्या गणरायाला निरोप
Ambad Ganesh Visarjan 2025 : अंबडमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला, युवक, बालकांसह संपूर्ण शहराने ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्यात सहभागी होऊन शांततेत बाप्पाला निरोप दिला.
अंबड : जालना जिल्हयातील अंबडनगरीत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व भक्त शनिवारी (ता.6) सकाळपासून सज्ज झाले होते. आरती, महाप्रसाद वाटप, वाहनाची सजावट,ढोल, ताशा, लेझिम पथकसह आदीचे नियोजन करत दुपारी चार वाजेनंतर मिरवणुकीला वाजत गाजत सुरुवात झाली. रात्री उशिरा पर्यंत मिरवणूक सूरू होती. बाळानगर व शहीद भगतसिंग गणेश मंडळाच्या वतीने महीला, युवती, युवक व बालकांना सहभागी करत सुंदर लेझिम पथक बसवीत शहराचे लक्ष वेधून घेतले.

