
माजलगाव : ‘टाळ-मृदंग गर्जती माझ्या विठ्ठलाची कीर्ती, गळा वैजयंती माळ कानी कुंडल शोभती’ या संत नामदेवांच्या अभंगाच्या साक्षीने तीन वर्षांपासून संत ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या दिंडी पालखी सोहळ्यात घळाटवाडी येथील मृदंगवादक गणेश महाराज सायबर सहभागी होतात. त्यांच्या मृदंगावरील थापाने वारकऱ्यांची ऊर्जा वाढविली आहे.