esakal | पहिल्याच दिवशी पाच हजार किलो मोदक फस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Modak

गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांच्याबरोबरच सर्व गणेशभक्तांचा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळेच बाजारात यंदाही वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आले आहेत. त्यांना लातुरातील खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार किलो मोदक लातूरकरांनी फस्त केल्याचा अंदाज मिठाई व्यावसायिकांनी सकाळकडे व्यक्त केला.

पहिल्याच दिवशी पाच हजार किलो मोदक फस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर - गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांच्याबरोबरच सर्व गणेशभक्तांचा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळेच बाजारात यंदाही वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आले आहेत. त्यांना लातुरातील खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार किलो मोदक लातूरकरांनी फस्त केल्याचा अंदाज मिठाई व्यावसायिकांनी सकाळकडे व्यक्त केला. 

गणपती बाप्पांच्या नैवेद्यात हमखास असणारा एक पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळे घराघरांत तळलेले मोदक पाहायला मिळतात; पण दररोजचा प्रसाद म्हणून घरांत आणि गणेश मंडळांत वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक भक्तांना दिले जातात. त्यामुळेच मिठाई व्यावसायिकांकडे खवा मोदक, सुकामेवा मोदक, चॉकलेट मोदक, केशर मोदक, मलई मोदक, मोतीचूर मोदक, कोकोनट मोदक असे वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि वेगवेगळ्या आकारांतील मोदक आले आहेत. विविध रंगांचा वापर करून तयार केलेले मोदकही पाहायला मिळत आहेत. 

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शहरातील मिठाईची दुकाने दिवसभर गर्दीने तुडुंब भरली होती. त्यामुळे तयार मोदकांकडे लातूरकरांचा कल वाढत असल्याचेच दिसून आले. काही दुकानांत तर पाव किलोचा एक मोदक असे मोठ्या आकाराचेही मोदक पाहायला मिळाले. अशा मोदकांबरोबरच सुकामेवा मोदक, चॉकलेट मोदक, कोकोनट मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांना जास्त मागणी आहे. असाच प्रतिसाद गौरी-गणपतीच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी ग्राहकांमधून मिळतो, अशीही माहिती काही व्यावसायिकांनी सांगितली.

loading image
go to top