

Gangapur Cooperative Society Annual Meeting Approves Resolution To Name Institution After Ashok Patil Dongavkar
esakal
-रामेश्वर अमृते
गंगापूर: गंगापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ता.३० बुधवार रोजी पार पडली. संस्थेचे सभापती बद्रीनाथ बाराहाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संस्थेस दिवंगत मा. मंत्री तथा आमदार अशोक पाटील डोणगावकर यांचे नाव देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.