

Court Sentences Three Accused in Government Work Obstruction Case
रामेश्वर अमृते
गंगापूर : शासकीय कामासाठी रस्ता मोकळा करून देण्याची कारवाई सुरू असताना शासकीय अधिकारी व पोलिसांच्या कामात अडथळा आणुन पोलिस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारल्याप्रकरणी तिघांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवार ता. २६रोजी जाहीर करण्यात आला.सिरजगाव ता. गंगापूर येथे मंडळ अधिकारी व पोलिस कर्मचारी शासकीय कामानिमित्त रस्ता मोकळा करून देण्याची कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपींनी जेसीबी वाहनासमोर येत दमदाटी व हुज्जतबाजी करून कारवाईत अडथळा निर्माण केला.