

Gangapur Fake Robbery
sakal
गंगापूर: गंगापूर येथील भारत फायनान्शियलच्या शाखेअंतर्गत असलेल्या ग्राहकांकडून वसूल केलेली ६८ हजार ५६ रुपयांची रोख रक्कम लांबवण्यासाठी ता.२१ सप्टेंबरच्या संध्याकाळी कटानुसार मित्रांनीच किरणचे हात-पाय बांधले, शर्ट फाडला आणि चाकूने किरकोळ जखमा करून चोरीचा खोटा बनाव रचणाऱ्या फिल्ड असिस्टंटचा)आणि त्याच्या दोन मित्रांचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात मंगळवारी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपींचा बनाव अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे.भारत फायनान्शियलचे गंगापूर शाखा व्यवस्थापक योगेश तुळशीराम गिते रा.समतानगर,गंगापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला आहे.कंपनीत