
Gangapur : साखर कारखाना निवडणुक; कृष्णा पाटील डोणगावकर पॅनेलची विजयाच्या दिशेने वाटचाल
गंगापूर - गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरुद्धच्या कृष्णा पाटील डोणगावकर पेनलने साडे नऊशे मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने चाल केली आहे. बुधवारी (ता. १३) २० जागांसाठी ४० जण उमेदवारीच्या रिंगणात होते. सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव आधीच बिनविरोध निवडून आले होते.
आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट- मनसे असा सामना रंगला होता. सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला तेंव्हा कृष्णा पाटील डोणगावकर यांचा पेनल साडे पाचशे मतांनी आघाडीवर होता. तर विद्येमान आमदार व कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांचा पेनल यांचा प्रत्येक गावात पिछाडीवर होता.
कृष्णा पाटील डोणगावकर यांनी जुन्या लोकांना सोबत घेऊन निवडणुकीची योजना आखली. त्यांना यात यश मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. अजूनही मतमोजणी सुरूच असून, ७ हजार ५९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. चिठ्ठ्या पद्धतीचे मतदान असल्याने अधिकारी कर्मचारी दिवसभर ताटकळत बसले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.