esakal | वसमत येथे लिटल किंग्ज स्कूलमध्ये झाडात साकारला गणपती
sakal

बोलून बातमी शोधा

वसमत येथे लिटल किंग्ज स्कूलमध्ये झाडात साकारला गणपती

वसमत येथे लिटल किंग्ज स्कूलमध्ये झाडात साकारला गणपती

sakal_logo
By
पंजाबराव नवघरे

वसमत: महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या कडेची झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. यातीलच एका तोडून टाकलेल्या चिंचेच्या झाडाला आकार देत वसमत येथील लिटल किंग्ज विद्यालयाने त्यातून गणपती साकारला आहे. साकारलेला गणपती सर्वाचे आकर्षण ठरत आहे. या महामार्गाचे काम काही महिन्यापासून सुरू आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

कडेला तोडून टाकलेले चिंचेचे झाड लिटल किंग्ज विद्यालयाने शाळेत आणण्याचा निर्णय घेतला. वन अधिकाऱ्याला संपर्क साधला. वन विभागातील दंडे यांना तोडून टाकलेले झाड शाळेत नेऊन विध्यार्थ्यांना एक सुंदर संदेश देणार असल्याचे शाळेने सांगितले. याबद्दलही माहिती देणार असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी लगेच होकार दिला.

सुतार बाबा पांचाळ, बबन पांचाळ यांनी त्याच्या फांद्याना टोकं तयार करून पेंन्सीलचा आकार दिला. त्यानंतर तयार झाले शाळेतील मुलांचे पेन्सीलचे झाड. त्यावर मेसेज लिहिलेली पाटीही लावण्यात आली, त्यावर ‘तुम्ही मला जगविले तर, मीही तुम्हाला जगविल’! मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे', 'झाडं लावा अन ती जगवा' चा संदेश दिला.

टाकाऊ बुडापासून साकारला गणपती

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या साह्याने गणपतीच्या काणासाठी दोन सूप आणून त्या लाकडाला गणपतीचा आकार देण्यात आला. लाकडाच्या खोडावर कृष्णकमल वेळी सुंदरपणे बहरली होती तिला न हटवता लाकडाच्या खोडाला गणपती बनविला. गणपतीच्या आजूबाजूला सर्व फळांची आणि शोभेच्या झाडांचीच आरास करण्यात आली आहे.

मुलांनीच निसर्ग गणेश मंडळ तयार केले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो माणसं ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यूमुखी पडली. भविष्यात ऑक्सिजन कमी पडून माणसं मरू द्यायची नसतील तर झाडं लावून ती जगवली पाहिजे, देव हा झाडात शोधला पाहिजे हा सुंदर संदेश मंडळाने दिला आहे.

गणेश मंडळात समर्थ शिकारी, वेदांत अलोने, ऐश्वर्या कातोरे, कल्याणी दळवी ,समर्थ डिगुळकर, श्रमण खंदारे, पार्थ सइमं, प्रचित डोंगरे, श्रुष्टी दळवी, आदित्य गावंडे आदी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यांना संजय उबारे, थडवे, गावंडे, अंभोरे, ढोरे, गोविंद दळवी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

loading image
go to top